नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – पहिल्या दिवशी एकूण 54 नामनिर्देशनपत्रे आज दुसऱ्या दिवशी 28 असे एकूण 82 नामनिर्देशन पत्र देण्यात आली आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. त्याचा तपशील खालीप्रमाणे आहे.
सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पार्टी अशी दोन नामनिर्देश पत्र दाखल झाली आहेत. तर आज एकूण 8 जणांनी 28 नामनिर्देश अर्ज घेऊन गेले आहेत, अशी माहिती 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
आज नामनिर्देशन पत्रे घेऊन गेलेल्या पक्षांची/प्रतिनिधी पुढील प्रमाणे – अपक्ष 11, एम आय एम 5, बहुजन महापर्टी 1, धनवान भारत पार्टी 3, बहुजन विकास आघाडी पार्टी 2, भारतीय मानवता पार्टी 2, स्वाभिमानी रिपब्लिक पार्टी 2, अमन समाज पार्टी 2. एकूण 28 नामनिर्देशन पत्र घेऊन गेले आहेत.



