DESK MARATHI NEWS.
नागपूर/प्रतिनिधी -देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी बोरगाव येथील आश्रमशाळेत बौद्धिक व शारीरिक विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अभ्यास दौऱ्याअंतर्गत विद्यार्थ्यांना नागपूर मेट्रो सफर घडविण्यात आली. मुलांनी समर कॅम्पमध्ये शिकलेल्या कलांचे दर्शन मेट्रोमध्ये दिसून आले.
त्यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजी यांचे धावत्या मेट्रोमध्ये रांगोळीद्वारे रेखाचित्र रेखाटले. तर क्ले आर्टसच्या मुलांनी भगवान बिरसा मुंडा यांची कलाकृती तयार केली. यावेळी अपर आयुक्त आयुषी सिंग, उपायुक्त दिगांबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद नितीन इसोकर, सहाय्यक प्रकल्प झाडें, सोनावणे, भुसारी, कपिल शर्मा, उईके, मेश्राम, मुख्याध्यापक खेडकर यांनी मेट्रोने प्रवास करत मुलांशी संवाद साधला.



