Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर

कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा १४५ रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस देखील रस्त्यावर उतरले आहेत. आज कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने  स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी कल्याण वाहतूक शाखेचे एसीपी उमेश पाटील, पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले. तसेच रिक्षा चालकांना मास्क वाटप करत विना मास्क प्रवाशांना घेऊ नये, रिक्षात दोन पेक्षाअधिक प्रवासी घेऊ नये अन्यथा कारवाई होईल अशी सक्त ताकीद देखील रिक्षा चालकांना देण्यात आली.

Translate »
X