नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला/प्रतिनिधी – आज कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे.तर कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या थोबाडीत मारली आहे असा आजचा निकाल आहे. भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील बेरोजगारीचे मुद्दे असतील .यापेक्षा बजरंग बलीचा जन्म कुठे झाला. केरलाचा चित्रपट बघा. हिंदू हिंदू करता 82% हिंदू आहेत.तर 12 टक्के मुस्लिम आहेत. आज लिंगायत समाजाने मोठ्या प्रमाणात आणि कर्नाटकच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला सपशेल नाकारलेल आहे.
तरी भाजपचे प्रवक्ते गिरेभितो टांग उपर आपल्या कडे म्हण आहे. तशा पद्धतीने वागण्याचं काम करत आहे. आजचा हा निकाल भाजपच्या दृष्टीने मोठी चपराक आहे. तर याचा दुर्गामी परिणाम. महाराष्ट्रासह इतर दोन राज्यच्या निवडणुकीत याचा दुर्गामी परिणाम दिसेल.कर्नाटकच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. कारण तेथील जनतेने भाजपचं विषारी राजकारण संपवलं आणि दक्षिण भारतामधील त्यांचे दरवाजे बंद केले असल्याची प्रखर टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.