नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
हिंगोली/प्रतिनिधी – सध्या रब्बी पिकाला पाणी देण्याची ठरलेली वेळ व अशातच हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक 33 केव्ही 66 केव्ही उपकेंद्रातून कमी दाबाने विद्युत पुरवठा केला जात आहे. तर अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांची पिकं पाण्याअभावी वाळु लागली आहेत.
येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणाला तोंडी,लेखी निवेदन देऊन ही विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही यामुळे विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे . याच्या विरोधात आज चवदा गावातील शेतकऱ्यांनी नरसी नामदेव येथील 33 केव्ही विज केंद्रासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करत आठ तास विज द्या, वीज पुरवठा सुरळीत करा आशी मागणी करत आंदोलन केले आहे. लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. या ठिय्या आंदोलन चवदा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



