नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री असताना 2014 साली दत्तक घेतलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात वाकलन गावात सोयी सुविधांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय .
वाकलन गावामध्ये आजही महिला तलावावर धुनी, धुतात गावात पाणी नाही ,चांगले रस्ते नाहीत मुख्यमंत्र्यांनी दत्त घेतलेला गावाची अशी अवस्था असेल तर उर्वरित मतदार संघाचे काय असा सवाल वैशाली दरेकर यांनी केलाय . डोंबिवली पूर्वेकडील पाटीदार भवन येथे महाविकास आघाडीचा मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.