महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी लोकप्रिय बातम्या

अलिबागचा भौगोलिक मानांकन मिळालेला पांढरा कांदा ठरतोय पांढर सोन

नेशन न्यूज मराठी टीम.

अलिबाग/प्रतिनिधी – कांदा हे पिक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकट करणारे तर कधी डोळयात पाणी आणणारे पिक आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच आहे. या कांद्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर तो अधिकच लोकप्रिय होत आहे. जिल्ह्यात पूर्वापार खंडाळा, पवेळे, नेहुली, सहाण, ढवर, कार्ले, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम, आवास अशा अलिबाग नजिकच्या ठराविक गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची साधारणपणे 250 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.

अलिबागचा पांढरा कांदा लाल गुलाबी कांद्यासारखा तिखट नसून गोड असतो. त्याला मोत्यासारखा शुभ्र चकाकदार रंग असून त्याला मोठे आयुर्वेदिक महत्व आहे. डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा, ग्रेट मिशन ग्रुप कन्सलटन्सी पुणे, जीएमजीसी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी संयुक्तपणे पेटंट ऑथॉरीटी ऑफ इंडीया, चेन्नई यांच्याकडे “अलिबाग पांढरा कांदा” चे भौगोलिक मानांकनासाठी सन 2019 मध्ये अर्ज सादर केला होता. त्याला करोना कालावधीमुळे उशीर झाला होता. मात्र पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन सन सप्टेंबर 2022 मध्ये प्राप्त झाले. आता प्रकल्प संचालक आत्मा आणि पणन महामंडळ यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे ” Authorised User Registration ” करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या पांढऱ्या कांद्यामध्ये TSS-9.45, Dry Matter-6.1 (Low), Non Reducing Sugar-2.3, Pyruvic Acid-1.05, Quicertin- 0.92 (high), N-2799 mg/100 gm, P- 443 mg/100 gm, K- 1898 mg/100 gm, Ca-118.50 mg/100 gm, Na-355 mg/100 gm, Zn-3.8 mg/100 gm, Eu, Fe-33 mg/100 gm, Mn-2.65 mg/100 gm, S-2.02 mg/100 gm हे महत्वाचे घटक आहेत. हा कांदा पातीसह काढल्यानंतर सुकविण्यात येतो व पहाटेच्या वेळी त्याची वेणी बांधली जाते नंतर वेणीसह कांदे विक्रीसाठी बाजारात येतात. त्यामुळे पानातील Absecic acid कांद्यात उतरते आणि त्याला सुप्तावस्था प्राप्त होते. या वैशिष्टयपूर्ण प्रक्रियेमुळे पांढरा कांदा न कुजता वर्षभर हवेशीर वातावरणात चांगल्या पध्दतीने टिकतो. त्यामुळे त्याला वर्षभर चांगला बाजार भाव मिळतो. कांद्यातील कमी प्रमाणातील सल्फर घटक आणि समुद्रालगतचे खारे वारे व रेतीमय उथळ हलकी जमीन यामुळे या कांदयाला वैशिष्टयपूर्ण चव येते,

या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे त्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. काही शेतकरी कांदयाचे बी तयार करतात ते साधारण 600-800 Kg/ha या प्रमाणात तयार होते. बाजारामध्ये बियाणे 3 हजार 500 ते रु.4 हजार किलोग्रॅम या दराने विकले जाते. तर कांद्याची वेणी 3 ते 4 किलो ग्रॅम वजनाची असते व ती 200-300 रू या दराने विकली जाते. काही शेतकऱ्यांनी आता कांदा निर्यात करण्याची तयारी सुरू केली आहे. या कांद्याचे उत्पादन हेक्टरी 33 टन इतके येते. उत्पादनासाठी येणारा खर्च रू. 4 लाख 50 हजार प्रती हेक्टरी असून रू. 10 लाख इतके उत्पादन एका हंगामात मिळते. साधारण रू. 25 हजार प्रति टन हा दर मिळाला तर प्रति हेक्टरी रू. 5 लाख इतका निव्वळ नफा पांढरा कांदा हे पिक देऊ शकतो.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »