महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी देश

भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी संयुक्तपणे आयोजित करणार तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – नवी दिल्ली येथे 25 ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधीत भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी संयुक्तपणे, 35 देशांचे लष्करप्रमुख आणि प्रतिनिधींची तीन दिवसीय परिषद आयोजित करण्‍यात येणार आहे. यामध्ये 13 व्या आयपीएसीसी, 47 व्‍या आयपीएएमएस आणि 9 व्या एसईएलएफ यांचाही समावेश असणार आहे.

“शांततेसाठी सहयोग: हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील शाश्वत शांतता आणि स्थैर्य”, ही या मंचाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही परिषद प्रामुख्याने हिंद प्रशांत महासागर प्रदेशातील देशांचे लष्कर प्रमुख आणि पायदळातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना, सुरक्षा आणि समकालीन मुद्द्यांवर विचार आणि दृष्टीकोन याची देवाणघेवाण करण्याची संधी देईल. तटीय भागीदारांमधील परस्पर सामंजस्य, संवाद आणि मैत्री याद्वारे हिंद प्रशांत महासागर प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे हा या मंचाचा प्रमुख प्रयत्न असेल.

या परिषदेच्या तीन टप्प्यांमध्ये पूर्ण सत्रे आणि अनौपचारिक बैठका होणार आहेत. लष्कर प्रमुखांच्या परिषदेत प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्व लाभधारकांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी परस्पर हिताच्या आणि सहकार्याच्या क्षेत्रांवर चर्चा केली जाईल. या कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत उपकरणांचे प्रदर्शनही आयोजित केले जाईल. परिषदेत सहभागी प्रतिनिधींना राजधानी दिल्ली मधील काही वारसा स्थळांना भेट देऊन भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेची झलक पाहायला मिळेल. –‘आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन’ ने राबविलेल्या विविध उपक्रमांचीही ते माहिती घेतील.

माणेकशॉ सेंटरमध्ये आज आयोजित ‘कर्टन रेझर’  कार्यक्रमादरम्यान, भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी कार्यक्रमाच्या आराखड्याबद्दल माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. ‘कर्टन रेझर’ कार्यक्रमादरम्यान, अमेरिका, फ्रान्स, जपान, मालदीव आणि सिंगापूरच्या परराष्ट्र सेवा खात्याशी संबंधित प्रतिनिधींनी गोलमेज चर्चा सत्रात भाग घेतला. “हिंद प्रशांत महासागर क्षेत्राच्या सुरक्षेपुढील अपारंपरिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहयोगी दृष्टीकोन”, हा या चर्चा सत्राचा विषय होता.

ही परिषद सहभागी देशांच्या सामायिक संकल्पाचा दाखला ठरेल, आणि फलदायी चर्चेचा मार्ग मोकळा करेल. तसेच विचारांची देवाणघेवाण आणि सर्वोत्कृष्ट पद्धतींचे आदान-प्रदान याद्वारे  सहभागी देशांमधील भागीदारी आणखी दृढ करेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »