नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली भागात घडला. सुदैवाने गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधान व धाडसामुळे महिलेचा जीव वाचला असून दोन्ही नराधम गजाआड करण्यात यश आले आहे. त्या एक पोलीस जखमी झाला आहे .वेळ पोलीस घटना स्थळी पोहचल्याने महिलाची या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रिक्षेत महिला बसल्या नंतर रिक्षा चालकाने रिक्षा पुढे नेली. रिक्षा जेव्हा निर्जनस्थळी जात होती. याच दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांनी पाहिले. तोपर्यंत रिक्षा पुढे निघून गेली होती. मात्र या दोन्ही पोलिसांना रिक्षा निर्जनस्थळी का जात आहे याचा संशय आला. दोघांनी रिक्षा ज्या दिशेने गेली आहे. त्याच दिशेने दुचाकी फिरवली. थोड्याच वेळात हे दोघे पोलीस रिक्षा जवळ पोहचले. मात्र त्यांनी पाहिले की, एक महिला नग्न अवस्थेत उभी आहे. तिच्या सोबत दोन तरुण अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पाहताच त्या दोन्ही पोलिसांनी त्यांच्या दिशेने झडप घेतली. दोघे नराधम आणि पोलिसांत हाणामारी झाली. दोन्ही नराधमांनी एका पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले. तरी देखील त्यांनी त्या दोन्ही नराधमांना सोडले नाही पकडून ठेवले. पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. लगेचच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दोन्हीही नराधमाना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये प्रभाकर पाटील हा नराधम कल्याण ग्रामीणमधील उसरघर परिसरात राहतो. तो रिक्षा चालवितो त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो दिवा येथील आगासन येथे राहणारा आहे. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र मानपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची जीव आणि आब्रू वाचवत, दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. धाडसी कामगिरी करणाऱ्या दोन्ही पोलीस सुधीर हसे आणि अतुल भोई यांचे मानपाडा पोलिसांकडून कौतूक करण्यात आले आहे. त्यांचे
या कामगिरी केल्याने कौतुक करावे तेवढे कमी आहे .



