महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई /प्रतिनिधी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०९ व १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ संयुक्त पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामधून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत अहंताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गात पदांची संख्या ३७६ असून शारीरीक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची संख्या १५३५ आहे.

या निकालाआधारे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व अर्जात प्राविण्यप्राप्त (गुणवत्ताधारक) खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या  शुध्दिपत्रकातील तरतुदीनुसार  अराजपत्रित गट-ब पदाकरिता त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र वैध ठरते किंवा कसे याच्या पडताळणीकरीता सदर प्रमाणपत्र संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर, २०२१ या अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वी सादर केल्याची पोचपावती, त्या दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे संबंधित क्रीडा प्रमाणपत्र व सदर क्रीडा विषयक प्रमाणपत्र गट-ब पदाकरिता वैध ठरत असल्याबाबतचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदाचा शारीरिक चाचणी व मुलाखत कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरुन स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. याबाबतचा सविस्तर तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निकालातील अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाचे परिक्षोत्तर उपसचिव (अप) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »