महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कला/साहित्य थोडक्यात

नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्यात प्रकाशन विभाग आपली पुस्तके आणि जर्नल्स करणार प्रदर्शित

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारत सरकारचे प्रमुख प्रकाशन गृहाचा प्रकाशन विभाग 31व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्यात आपल्या पुस्तकांचा आणि जर्नल्सचा समृद्ध संग्रह प्रदर्शित करणार आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक मेळ्यांपैकी एक मानला जाणारा नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 25 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीत प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. नॅशनल बुक ट्रस्ट ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने या मेळ्याचे आयोजन करत आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकणाऱ्या आणि देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणाऱ्या आपल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ पुस्तक संग्रहाचे प्रदर्शन प्रकाशन विभाग करणार आहे. पुस्तक प्रदर्शनात इतिहास, कला आणि संस्कृती, गांधीवादी साहित्य, प्रदेश आणि लोक, व्यक्तिमत्त्वे आणि चरित्रे, सिनेमा, बालसाहित्य आणि यासारख्या इतर अनेक विषयांवरील पुस्तके मांडली जाणार आहेत. याशिवाय, प्रकाशन विभाग आपली राष्ट्रपती भवनातील पुस्तकांची मालिका तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भाषणेही या मेळ्यात पुस्तक रूपात सादर करणार आहे. हे साहित्य केवळ प्रकाशन विभागाद्वारेच प्रकाशित केले जाते.

पुस्तकांसोबतच प्रकाशन विभागाची ‘योजना, कुरुक्षेत्र आणि आजकल’ ही आघाडीची नियतकालिके पुस्तकांच्या स्टॉलवर उपलब्ध असतील. मुलांचे लोकप्रिय मासिक बाल भारती देखील प्रदर्शनाचा भाग असेल. एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) हे प्रकाशन विभागातील सर्वाधिक मागणी असलेले रोजगार संबंधित साप्ताहिक वृत्तपत्र देखील उपलब्ध असेल.

प्रकाशन विभाग आपली पुस्तके आणि जर्नल्स – स्टॉल क्रमांक 171-186, हॉल क्रमांक 5, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे प्रदर्शित करेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »