नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट ५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या संदर्भात आज २७ डिसेंबर रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सुनील शेळके यांनी माहिती दिली.
यावेळी महात्मा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यंच्यासह आदींची उपस्थिती होती. सुनील शेळके यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले व सावत्रीबाई फुले यांचा धगधगता जीवन प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. महात्मा फुलेंची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी साकारत असून व सावित्रीबाईच्या भूमिकेत राजर्षी देशपांडे या दिसणार आहेत. संदीप कुलकर्णी यांना या आधी डोंबिवली फास्ट व श्वास या दोन मराठी चित्रपटासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच या चित्रपटाला बेस्ट ऑटोबायोग्राफीचे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले व जर्मनीचा नामांकित बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार दिग्दर्शकाला मिळाला. असे बरेच पुरस्कार या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मिळाले आहेत. निलेश जळमकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन सुद्धा केले आहे.