DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने सुरु असताना त्या आधीच कोणीतही सोशल मिडियावर प्रारुप प्रभाग रचनेचा मसूदा व्हायरल करुन संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. संबंधितांना नोटिस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविला जाणार आहे. त्यांचा खुलासा योग्य वाटला नाही तर संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिला आहे.
नागरीकांनी अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊ नये त्याच बरोबर सोशल मिडियावर फिरणारे पत्रक व्हायरल करू नये असे आवाहनही उपायुक्त मिसाळ यांनी केले आहे. केडीएमसी निवडणूकीचा प्रभाग प्रारुप रचना ३१ जुलै पर्यंत तयार होणार असल्याची माहिती यावेळी उपायुक्त मिसाळ यांनी माध्यमांना दिली आहे.