नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
सोलापुर/प्रतिनिधी – सोलापूरात १९६० ते ७० च्या दशकात हातमाग व्यवसाय अत्यंत भरभराटीत चालत होता. त्यामुळे कामगारांना किमान रोजगार मिळत होते. त्यानंतर यंत्रमाग उद्योगाला चालना मिळाल्यानंतर हातमाग व्यवसायाला उतरती कळा लागली. परंतु ज्यांची रोजीरोटी या व्यवसायावर आहे त्या लोकांनी तग धरून हा व्यवसाय टिकवला आणि राष्ट्रीय उत्पादनाची परंपरा कायम ठेवली. या व्यवसायाला आता उर्जितावस्था प्राप्त होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी लढा उभारण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी विजयी मेळाव्यात केला.
महात्मा हातमाग विणकर संघ यांच्या वतीने गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सिटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम यांचा अध्यक्षतेखाली विजयी मेळावा पार पडला.यावेळी प्रास्ताविकात महात्मा हातमाग विणकर संघाचे सिद्राम तट्टे म्हणाले कि, राज्यातील वस्त्रोद्याग क्षेत्रातील वाढीस चालना देण्यासाठी दि. २/६/२०२३ रोजी राज्यातील सर्व विणकर (हातमाग) यांना गणेशोत्सव निमित्त प्रतिपुरुष दहा हजार रुपये आणि प्रति महिला विणकरांना पंधरा हजार रुपये गणेशोत्सव भत्ता देण्यात येईल तसेच विणकर कुटुंबांना प्रतिमहा २०० युनिटपर्यंत मोफत विज देण्यात येईल व कच्चा माल पुरवठा पुरवठा अंतर्गत केंद्र सरकार १५% व राज्य शासन १५% एकूण ३०% अनुदानाचा लाभ अनुश्रेय आहे. हा शासन निर्णय झाला होता पण प्रत्यक्षात या शासन निर्णयाची अंमलबजावणी मात्र होत नव्हती.माजी आमदार कॉ. नरसय्या आडम व सेंटर ऑफ ट्रेड युनियन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व विणकरांना घेऊन दि. १७/९/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद साहेब सोलापूर यांना निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार व पणण मंत्री, महसुलमंत्री यांना देण्यात आले व त्यानंतर दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी मंत्रालय येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्रातील शासनाने वस्त्रोद्योग धोरण जाहिर केले असून या योजनेतील तरतुदींना महाराष्ट्रातील सर्व विणकर हातमाग व कारागीरांना अंमलबजावणी करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. २ नोव्हेंबर २०२३ रोजी हातमागाच्या मागणीसाठी निर्वाणीचा इशारा म्हणून माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या मार्गदर्शनाखाली महामोर्चाद्वारे शासनास आपल्या मागण्या मांडण्यात आल्या त्यास शासनाने ९ व १० नोव्हेंबर २०२३ रोजी सर्व मागण्या मान्य केल्या.
वेळोवेळी निवेदन व कॉ. नरसय्या आडम यांच्या सतत पाठपुरावण्यामुळे दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने सुधारीत शासन निर्णय जाहिर केला असून यात राज्यातील सर्व विणकर हातमाग व कारागीरांना उत्सव भत्ता म्हणून महिलांना १५ हजार रुपये व पुरुषांना १० हजार रुपये हे येणाऱ्या मकर संक्रांतीला देण्यात येईल व राज्यातील सर्व विणकर हातमाग कुटुंबाना प्रतिमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल तसेच १५% कच्च्यामालाला अनुदान देखील देण्यासंबंधी शासन निर्णय मंजूर करण्यात आले आहे.
कच्चा माल पुरवठा योजनेतंर्गत केंद्र शासन 15% व राज्य शासन 15% एकूण 30% अनुदानाचा लाभ अनुज्ञेय आहे. हातमाग विणकर कल्याणकारी योजनेतील तरतुदींनुसार हातमाग विणकर/कारागीरांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. येत्या मकर संक्राती सणासुदीला हातमाग विणकर कुटुंबाना प्रतिमहा 200 युनिट पर्यंत मोफत विज देणे. प्रती पुरुष विणकर रु. 10,000/- आणि महिला विणकरांना रु. 15,000/- उत्सव भत्ता देण्यात येईल असे जाहीर केले आहे. राज्यात इतर उत्पादने घेणा-या हातमाग विणकरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा भत्ता संपूर्ण महाराष्ट्रात हातमागावर विविध उत्पादने तयार करणा-या सर्वच हातमाग विणकर व कारांगीरांना लागू करावा. सोलापूर शहर व जिल्ह्यात हातमागावर विविध उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. परंतु या उत्पादनांत अत्यल्प मजूरी मिळत असल्याने अनेक विणकरांकडे उत्कृष्ठ कौशल्य असून देखील इतर रोजगाराकडे वळावे लागत आहे. हा सण भत्ता लागू केल्यास ही मंडळी आनंदाने पुन्हा हातमागावर काम करण्याकडे वळतील. पुढची पिढी देखील या क्षेत्रात टिकून राहील. अशी मागणी ज्येष्ठनेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली असता येत्या चार दिवसात शासन निर्णय जाहीर करून वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन दिले.
यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम एच.शेख, माजी नगरसेविका नलिनिताई कलबुर्गी, अशोक इंदापुरे मेळाव्यास संबोधित केले.
यावेळी व्यापीठावर राजू काकी, श्रीनिवास बंडा, सावित्री बंडा, पांडुरंग काकी, अंबादास कुणे, व्यंकटेश मादगुंडी, व्यंकटेश कैंचगुंडी, तुळशीदास पोतू, सुरेश मादगुंडी, विजयकुमार रोड्डा, नागनाथ मादगुंडी, अंबादास मादगुंडी, विरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती.



