महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

प्रवासी कुटुंबावर हल्ला करत आरोपींनी लाखोंचे सोने केले लंपास

सांगली/प्रतिनिधी – उन्हाळी सुट्ट्या असल्या कारणाने अनेकजण फिरायला बाहेर पडत आहे. मोठ्या प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू, दागिने न घालण्याचा सल्ला दिला जातो. पण काहीजण एवढे बिंधास्त असतात कि त्यांचे याकडे दुर्लक्ष्य होते. अशाच लोकांच्या शोधात चोरटे असतात. सांगलीतील कळंबीतून दरोड्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या हैदराबाद येथील प्रवासी वाहनावर दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात प्रवाशांचे 4 तोळे सोन्याचे दागिने चोरून दरोडेखोरांनी लंपास केले.

हैदराबाद मधील चंद्रकांत बावीकाडी हे कुटुंबासमवेत महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते. सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी आणि पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते. परंतु मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ते सांगली जिल्ह्यातील कळंबी या गावात पोहोचले. त्यांनी कळंबी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाचा आसरा घेऊन बावीकाडी कुटुंब गाडीमध्येच झोपी गेले. थोड्या वेळानंतर आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने बावीकाडी यांच्या कुटुंबाला गाठले. सर्वांना चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी महिलांच्या गळ्यातील 4 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच पंधरा हजार रुपयांची रोकड काढून घेतली. दरोडेखोरांना विरोध करताना चंद्रकांत बावीकाडी आणि त्यांच्या पत्नीवर दरोडेखोरांच्या टोळीने चाकू हल्ला केला. दरोडेखोरांच्या शोधासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिली आहे.

 

Related Posts
Translate »