महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकल बातम्या

केडीएमसीच्या ७ मजली वाहनतळाला मार्गीकाच नाही

नेशन न्यूज़ मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सात मजली पार्किंग उभारत त्यावर २२ मजली टॉवर उभारणाऱ्या विकासकाने या पार्किंगसाठी मार्गीकाच ठेवलेली नाही. तर बाजूलाच असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतीतुन पालिकेच्या वाहनतळाला मार्गिका जोडत पालिकेची फसवणूक केली आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर इमारत अनधिकृत ठरण्याची भीती असलेल्या ग्राहकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी पालिकेकडून मात्र विकासकाची पाठराखण केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शहाड परिसरात साई निर्वाणा हा २२ मजली प्रकल्प पालिकेच्या वाहनतळासाठी आरक्षित भूखंडावर उभारण्यात आला आहे. या जागेवर विकासकाने पालिका प्रशासनासाठी ७ मजली पार्किंग उभारत त्यावर २३ मजल्याची इमारती उभी केली आहे. तर याच भूखंडालगत एमएमआरडीएच्या राखीव जागेत विकासकाने एमएमआरडीएसाठी मोफत घराची इमारत उभारली असून या इमारतीला निवासी पार्किंग आहे. याच निवासी पार्किंग मधून पालिकेच्या वाहनतळासाठी मार्ग देण्यात आला असून पालिकेच्या ७ मजली पार्किंगसाठी स्वतंत्र मार्गिका नसल्याची बाब ग्राहकाच्या लक्षात आली आहे.

याखेरीज इमारतीत आवश्यक असलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गिका सोडण्या एवजी या जागा सदनिकेत जोडण्यात आल्याने प्रत्यक्षात पालिकेकडून मंजूर करण्यात आलेला नकाशा आणि उभी करण्यात आलेली इमारत यात अनेक त्रुटी दिसत असल्याने याप्रकरणी ग्राहकांनीच थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे ग्राहक के के मिश्रा यांनी सांगितले. तब्बल ३१२० स्क्वेअर मीटर जागेवर पसरलेल्या पार्किंगसाठी मार्गिका नसल्याने एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास वाहने बाहेर कशी काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्याचबरोबर एमएमआरडीएकडून राखीव कोट्यातील घराची विक्री झाल्यानंतर या सोसायटीकडून पालिकेच्या पार्किंगकडे जाणार्या मार्गिकेला विरोध झाल्यास या पार्किंगचा भविष्यात केवळ सदर इमारती मधीलच रहिवाशांना वापर करता येणार आहे. यामुळे हा संपूर्ण भूखंड पालिकेने विकासकाला आंदण दिल्याचा आरोप होत आहे. त्यातच विकासकाने या प्रकल्पासाठी पूर्णत्वाचा दाखला घेण्याआधीच इमारतीचा वापर सुरु केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान याप्रकरणी विकासक प्रकाश मुथा यांना विचारले असता त्यांनी इमारतीचा नकाशा शंकलेशा कन्स्ट्रक्शन या विकासकाच्या काळात मंजूर करण्यात आला असून हा प्रकल्प आता मुथा कन्स्ट्रक्शनने घेतला आहे. यात मुथा कन्स्ट्रक्शन कडून कोणतीही अनियमितता झालेली नसून जर पालिकेला आणि एमएमआरडीएला यात अनियमितता दिसत असेल तर त्यानी कारवाई करत इमारत तोडावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर पालिकेच्या नगररचनाकार दिशा सावंत याना विचारले असता त्यांनी याप्रकरणाची माहिती घेतली जाईल असे सांगत संबधित अधिकार्यांना तपासणीच्या सूचना दिल्याचे सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »