महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

ठाणे जिल्हा प्रशासन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज

नेशन न्युज मराठी टीम.

ठाणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुमारे २० हजार ३२६ बे़डस् उपलब्ध असून त्यापैकी ९०४४ ऑक्सिजन बेडस् आहेत. एप्रिल २०२१ मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. नागरिकांनी सावधानता बाळगत कोरोना नियमाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उपचारांच्या सुविधांनुसार सीसीसी मध्ये ६८२५, डिसीएचसी मध्ये ६९२८, डिसीएचमध्ये ६५७३ अशा एकूण २० हजार ३२६ रुग्णशय्यांची उपलब्धता आहे त्यामध्ये विलगीकरणासाठी ८४९०, ऑक्सिजनची सोय असलेल्या ९०४४, अतिदक्षता विभागातील २७९२ रुग्णशय्यांचा समावेश आहे. दि. ३ जानेवारी रोजीच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा पॉझीव्हीटी दर हा सुमारे ७.४५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ८ लाख ९१ हजार ४८७ एवढया चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात ६ हजार ३१८ सक्रीय रुग्ण असून त्यापैकी ९०० रुग्ण सीसीसीमध्ये, २४९ रुग्ण डीसीएचसी मध्ये, ४६४ रुग्ण डीसीएच मध्ये उपचार घेत असून सुमारे ३ हजार ३९६ रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. ३४४ रुग्ण ऑक्सीजनवर असून २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.ठाणे जिल्ह्यात २४ एप्रिल २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक ८३ हजार सक्रीय रुग्ण संख्या होती. त्याला २१९ मेट्रीक ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या संख्येच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीएसए प्लांट, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन साठविण्यासाठी टाक्या, सिलेंडर्स यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ३१ पीएसए प्लांट प्रस्तावित असून त्यापैकी २६ प्लांटच्या माध्यमातून ४५ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. तसेच सध्या ६७२ मेट्रीक टन लिक्विड मेडीकल ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता जिल्ह्यात विकसीत केली असून अजून २७० मेट्रीक टन साठवणूक क्षमता विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे श्री. नार्वेकर यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून उपचारांच्या सुविधेसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनोवर देखील भर दिला जात आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्याप आपला पहिला अथवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी त्वरीत घ्यावा. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे या कोरोना त्रिसुत्रीचा अवलंब करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »