DESK MARATHI NEWS.
अंबरनाथ/संघर्ष गांगुर्डे – ठाणे खंडणी विरोधी पथक हे नेहमीच आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे चर्चेत असते, आपल्या सतर्कतेचा वापर करत कधी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून गुन्हे घडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असते. अशीच एक कामगिरी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील व्दारली पाडा गावात केली आहे. व्दारली पाडा गावात अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारु तयार करण्याची हातभटटी सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारकडून ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेचे पोलिस त्वरित एक्शन मोड वर येत त्यांनी अंबरनाथ येथील व्दारली पाडा गावात अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारु तयार करण्याच्या हातभटटीवर छापा मारला व ती हातभटटी उध्दवस्त केली. त्याच बरोबर छापा कारवाईत आदेष पंडीत गायकर याला अटक केली.
या छापा कारवाईत बेकायदेषीरपणे गावठी हातभटटीचे दारूची निर्मीती करण्यासाठी लागणारे साहीत्यासह 3,15,950/- रू. किमंतीचा मुद्दे माल मिळून आला आहे. सदर अटक आरोपी विरूध्द हिललाईन पोलीस स्टेशन मध्ये रजि. नंबर 428/2025 महाराष्ट्र प्रोव्हिबिषन 1949 कलम 65 (ब), 65 (क), 65 (ई), 65 (फ) प्रमाणे गुन्हा दिनांक 03/07/2025 रोजी दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. आषुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 1, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे शाखा, ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोपि/भुषण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/4044 ठाकुर, पोहवा/1015 पाटील, पोहवा/शिंदे पोहवा/1510 गायकवाड, पोहवा/270 जाधव, पोहवा/1416 गडगे, पोहवा/4184 राठोड, पोहवा/18 कानडे, मपोहवा/4466 पावसकर, मपोहवा/6722 कांबरी, पोना/1925 हासे, पोना/7079 मधाळे, चापोना/7312 हिवरे, पोषि/3213 वायकर, पोषि/8246 ढाकणे, पोषि/2640 पाटील, पोषि/1984 शेजवळ, मपोषि/8101 भोसले यानी केली आहे.
