DESK MARATHI NEWS NETWORK.
बदलापूर/प्रतिनिधी – बदलापूरमध्ये खळबळ उडविणारी घटना समोर आली आहे. बदलापूरमधील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरला उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतलं आहे. या डॉक्टरवर दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसने बदलापूरमध्ये येऊन या डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसनं बदलापूर शहरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बंदी घातलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेली व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.
ओसामा शेख असं एटीएसने ताब्यात घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो बदलापूर पूर्वेकडील एका खासगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता. एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले. उत्तर प्रदेश एटीएसने केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आता या डॉक्टरच्या चौकशीनंतरच त्याचा खरंच दहशतवादी संघटनेशी संबंध होता की नाही याची माहिती समोर येईलच पण त्या आधीच शहरात मोठी खळबळ मजली आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई केली आहे.हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही.