नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नंदुरबार/प्रतिनिधी – दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरक्षेच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली परंतु केंद्र सरकारने या खासदारांना बेकायदेशीर हुकूमशाही पद्धतीने निलंबित केले. ज्या भाजपच्या खासदारांनी चार मुलांना संसदेत जाण्यासाठी पास दिली त्याबाबत विरोधी पक्षांच्या खासदारांनी गृहमंत्र्यांशी संरक्षणाच्या बाबतीत चर्चा घडवून आणावी ही मागणी केली.असे सांगत नंदुरबार येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली .
परंतु केंद्र सरकारने विरोधी पक्षाचे 146 खासदारांना निलंबित केले. म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आज नंदुरबार येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आले व लोकशाही वाचवा ही मागणी करण्यात आली यावेळी माकपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



