नेशन न्यूज मराठी टिम.
बीड/प्रतिनिधी – सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याच काम सुरू आहे. वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे.
मात्र आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटले आहे. परंतु इतर काही असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ठामपणे ठरवले असून आम्हाला भाजपच्या मुजोरी विरोधात लढणे क्रमप्राप्त असल्याचं अंधारे म्हणाल्या.माझ्या दृष्टीने आता खारघर मधील घटनेतील मृतांचा आकडा वाढत आहे त्यांच्या कडे लक्ष देणे महत्वाचे आहे असे ही त्या म्हणाल्या



