महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य ताज्या घडामोडी

कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत आनंद आणि अभिमान वाटेल अशी एक बातमी आहे. कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदय विकाराच्या उपचारांमध्ये अतिशय अवघड समजली जाणारी ट्रायफिकेशनची (हृदयातील तीन ब्लॉकमध्ये एकाच वेळी स्टेन टाकणे) अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली आहे. विशेष म्हणजे ठाणेपलीकडील रुग्णालयात पहिल्यांदाच ही अँजिओप्लास्टी यशस्वीपणे करण्यात आल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरातील जी प्लस सुपर स्पेशालिटी हार्ट केअर रुग्णालयात, काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने 79 वर्षांची व्यक्ती उपचारासाठी आली होती. त्यावेळी झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तब्बल तीन महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुमारे 80 ते 90 टक्के ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी करण्याचा सल्ला या रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आला. मात्र रुग्णाचे वय विचारात घेऊन त्याच्या नातेवाईकांनी त्याला नकार दिल्याची माहिती जी प्लस रुग्णालयाकडून देण्यात आली. परंतू रुग्णाच्या जीवाला असणारा धोका पाहता ट्रायफिकेशन अँजिओप्लास्टीचा पर्याय मुख्य कार्डीओलॉजिस्ट डॉ. अमोल जी.चव्हाण यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितला. ज्याला या रुग्णाच्या नातेवाईकांनी मंजुरी दिली.

तर ही ट्रायफिकेशन अँजिओप्लास्टी करताना हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या इतर नसा बंद पडण्याचा धोका होता. मात्र कार्डीओलॉजिस्ट डॉ. अमोल जी. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न करत एकाच वेळी 3 स्टेनस् टाकून हृदयाचा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करत या रुग्णाचे प्राण वाचवले. आणि अत्यंत किचकट असणारी ही अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पूर्ण केली. डॉ. अमोल जी. चव्हाण यांना ही अवघड अँजिओप्लास्टी पूर्ण करण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. तर यासाठी डॉ. चव्हाण यांना डॉ. ऋषिकेश गोसावी, डॉ. सागर शाम धीवार, संचालक विजय डी. राठोड, व्यवस्थापक डॉ. अजय सोनवणे, नागेश पगारे आणि अशोक भांगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आतापर्यंत मुंबईतील मोजक्याच रुग्णालयांमध्ये आणि हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच डॉक्टरांकडून ही अवघड अँजिओप्लास्टी यशस्वीपणे करण्यात आली आहे. या लोकांच्या पंक्तीमध्ये आता कल्याणातील जी प्लस रुग्णालय आणि डॉ. अमोल जी. चव्हाण यांनीही मानाचे स्थान मिळवले आहे. त्याबद्दल कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रातून आनंद आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »