नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – रावणगाव या ठिकाणी रोजच्या प्रमाणे शाळा भरली होती विद्यार्थी अभ्यास करण्यात गुंग होते. अचानक गेल्यावर्षी बांधकाम पूर्ण झालेली इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. गुत्तेदार व जिल्हा परिषद अभियंता यांनी बोगस काम केल्याचा आरोप रावणगाव येथील पालकांनी केला आहे. अभियंत्याला निलंबित करून गुत्तेदारावर कारवाई करा अशी मागणी गावकरी करत आहेत.
वैभव जाधव अस या गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सुदैवाने इतर विद्यार्थ्यांना मोठी दुखापत झाली नाही. ही घटना घडताच गावातील सर्व पालकांमध्ये व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा केंद्रप्रमुख तालुका गटशिक्षणाधिकारी किंवा तहसीलदार यांनी भेट दिली नाही. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी सुमारे दहा लाखाचा निधीतून शाळेचे बांधकाम झाले होते ,परंतु जिल्हा परिषद अभियंता व गुत्तेदार यांनी बोगस काम केले असा गावकऱ्यांचा आरोप आहे.



