महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स

खडकपाडा पोलिसांची दमदार कामगिरी,चोरून गाईची हत्या,करणारे दोन मारेकरी गजाआड

प्रतिनिधी.

कल्याण – खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने एन.आर.सी.परिसरातील एका तबेल्यातील जर्सी गाय चोरी करून तिची हत्या ६ जून रोजी समोरच करण्यात आली होती  त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे क्रूरतेचा कळस म्हणजे शरीरच्या प्रमुख अगांचे मांस कापण्यात आले आहे त्यानंतर खडक पाडा पोलिसांनी तपास सुरू केला होता मोठ्या शिताफीने भिवंडी आणि आंबिवली नेपच्यून मधून दोन चोरांना गजाआड केली आहे ही माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दुपारी दिली आहे.

         आंबिवली पश्चिम भागातील मोहने एन. आर.सी परिसरात संतोष रामधनी सिंग यांचा गाय व म्हशींचा तबेला आहे. शनिवारी ता ०६ रोजी रात्री तीन अडीज वाजेच्या सुमारास गोठयातील जर्सी जातीची गाय चोरी करून  समोरच तिची हत्या करून क्रूरतेचा कळस गाठला होता. अज्ञात व्यक्तींनी  गायीच्या अंगावरील प्रमुख मांस कापून काही भाग तसाच ठेवून पोबारा केला त्यामुळे हा प्रकार वैमनस्यातुन किवा चोरीच्या उद्देशाने केला आहे की, समाजात तेढ निर्माण होण्यासाठी कृत्य केले आहे का? या दिशेने खडकपाडा पोलिसानी तपास सुरू केला होता. पोलिसांनी २२ आणि २३  जुलै रोजी दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या १ ) आरोपी अफजल तस्लिम खान (३३) राहणार महाराणा किराणा दुकान जवळ माळा कॉलनी नदीनाका भिवंडी आणि ( २)  कैस मूर्तझा डोन (३१)  नेमॅच्युन सोसायटी बिल्डींग -२  रूम नंबर ५०४ आंबिवली कल्याण याना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. यांच्या मागावर पोलीस सहाय्यक अशोक पवार पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश बांगर डिटेकशन प्रमुख प्रीतम चौधरी, पोलीस कर्मचारी पवार , चन्ने यांनी खबरी व्दारे चोरांचा तपास लावला आणि त्यांना गजाआड करण्यात यश आले. तपास टीम अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती . पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी माहिती देताना सांगितले की आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम, ३७९ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,६,९, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आणि आरोपीनी परिसरात असे किती गुन्हे केले आहे का याचा देखील तपास कसून करण्यात येणार असल्याची माहिती पानसरे यांनी दिली. दरम्यान कल्याण सत्र न्यायालयात दोन आरोपींना हजर करण्यात येणार आहे .

Related Posts
Translate »