नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – देशात ज्याप्रमाणे बेरोजगारांचा प्रश्न गंभीर आहे त्याप्रमाणेच सध्या केंद्र व राज्यात कंत्राटी कामगारांची भरती व त्यांचे वेतन प्रश्न अधिकच तीव्र होताना दिसून येतात. यासाठी असंघटीत ,संघटीत क्षेत्रात हे कंत्राटी कामगार विविध मागण्यासाठी आंदोलन देखील करतात. अशातच ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचा मासिक वेतनाचा प्रश्न वर्षोनुवर्ष प्रलंबितच आहे.
यासाठी ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तीन वाजल्यापासून काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे परिवहन बस सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रोख पगार मिळावा त्याचप्रमाणे इतर मागण्या मान्य व्हाव्या यासाठी अनेक वर्षांचा पाठपुरावा करून देखील आम्हाला तो पगार थेट मिळत नसल्याने आम्ही हे आज आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.



