महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई

प्रतिनिधी.

कल्याण – महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय सहज चालता यावे यासाठी महापालिकेने यापुर्वीच पदपथांवरिल फेरीवाल्यांविरुध्द कारवाई सुरु केलेली आहे, त्याचप्रमाणे रस्त्यालगतची भंगार/बेवारस वाहने उचलण्याबाबतही महापालिकेने मोठी मोहिम सुरु केली आहे, त्यामुळे आता पदपथांवर अतिक्रमण करणा-या दुकानदारांवर कडक कारवाई करणार असे उद्गार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस अधिकारी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी, एम.सी.एच.आय. पदाधिकारी यांचे समवेत संपन्न झालेल्या मोबिलीटी कमिटीच्या बैठकीत काढले.या बैठकीत वाहतूक विभागाचे उप आयुक्त यांनी महापालिका परिसरात कुठे साईन बोर्ड लावावेत, पार्कींगची व्यवस्था कशी असावी याबाबत उपयुक्त सुचना केल्या. त्यानुसार महापालिका लवकरच साईन बोर्ड लावण्याची व्यवस्था करणार आहे, पार्कींगसाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांचा वापर कशाप्रकारे करता येईल याबाबत विचार केला जाईल, तसेच पी-1, पी-2 च्या पार्कींग व्यवस्था करण्यासाठी दुभाजक काढणेबाबत वाहतूक विभागाकडून प्राप्त सूचनांचा विचार केला जाईल, असे प्रतिपादन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. वाहन तळावर जमा केलेल्या बेवारस वाहनांचे ई ऑक्‍शन करणे, रिफ्लेक्टेड जॅकेट वाहतूक पोलिसांना पुरविणे, चुकीच्या ठिकाणी पार्कींग केलेल्या गाडयांना जॅमर लावणे, अनावश्यक ठिकाणी असणारे दुभाजक काढणे, त्याचप्रमाणे काही रस्ते केवळ पादचा-यांना चालण्यासाठी मोकळे ठेवणे इ. विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेने 7 ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी केली असून ते सिग्नल तोडल्यास संबंधितांना ई-चलान देण्याची व्यवस्था 15 दिवसांत करण्याचा प्रयत्न असल्याबाबतची माहिती पालिका आयुक्तांनी यावेळी दिली.सदर बैठकीस अति. आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्ली), वाहतूक पोलिस उपआयुक्त बाळासाहेब पाटील, सहा.आयुक्त पोलिस अनिल पोवार,‍ अन्य पोलिस अधिकारी , महापालिका अधिकारी , आरटीओचे प्रतिनिधी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी , एम.सी.एच.आय. संघटनेचे पदाधिकारी इ. मान्यवर उपस्थित होते.

Related Posts
Translate »