महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी.

पुणे – कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाच्या काळात शाळा महाविद्यालये सुरू करणे शक्य नाही हे आम्ही समजू शकतो. मात्र त्याला कुठेना कुठे सुरुवात करावी लागेल. त्यासाठी नियमावली तयार करून राज्यातील सर्व खाजगी क्लासेस सुरू करावेत. एकदा का हे क्लासेस सुरू झाले की शाळा महाविद्यालये सुरू करण्यास वेळ लागणार नाही, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सर्व ठिकाणी ऑनलाइन अभ्यासक्रम घेणे शक्य नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालये चालू करण्याबाबत शासनाने विचार करावा. त्यापूर्वी खाजगी क्लासेस चालू करण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी. शंभर विद्यार्थ्यां ऐवजी ४० विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी. एकदा का राज्यातील सर्व खासगी क्लासेस सुरळीत चालू झाले की शाळा महाविद्यालये हा शेवटचा टप्पा असून ते सहजपणे सुरू करता येतील. त्यासाठी राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज्यातील सर्व खाजगी क्लासेस नियमावली लावून सुरू केले की, त्याचा फायदा असा होईल की विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ते कमी होण्यास मदत होईल. एकदा भीती गेली की सर्वच गोष्टी सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Related Posts
Translate »