नेशन न्यूज मराठी टीम.
सातारा / प्रतिनिधी – जालना येथे मराठा बांधवांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्यभर निषेध होत असताना, सातारा जिल्ह्यात देखील आज सातारा बंदची हाक देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. तर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शांततेच्या मार्गाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांना जलनातील घटनेच्या संदर्भात निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या सातारा बंद मध्ये सर्व सातारकर बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मराठा बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी चार्जचा निषेध व्यक्त केला आहे. सातारा शहरात व परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त आहे. तर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी देखील सर्वांना शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.



