नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – दरवर्षी प्रमाणे मुंबई दादर शिवाजीपार्क येथे होत असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आज या मैदानात पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी या दसरा मेळाव्याच्या सुरक्षिततेची आणि कामाची पाहणी केली.
दसरा मेळाव्यात होणाऱ्या भाषणासाठी मोठा स्टेज उभारण्यात आला आहे.या दशहरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. या मैदानात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांसाठी आसनाची व्यवस्था केली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित असल्याते सांगण्यात येतेय. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षतेची व्यवस्थेचा आढावा यावेळी पोलिस विशेष आयुक्त देवेन भारती यांनी घेतला.दसरा मेळाव्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. त्याचबरोबर दसऱ्यादिवशी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची विशेष सुविधा करण्यात आलेली आहे.



