Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी चर्चेची बातमी

बाजार समितीत आवक घटल्याने ज्वारीचे वाढले भाव

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नंदुरबार/प्रतिनिधी – यंदा नंदुरबार (Nandurbar) कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीच्या भावात वाढ झाली आहे. वातावरण बदल तसेच मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बाजार समितीत ज्वारीची आवक फार कमी झाली आहे. आता हंगाम संपायला आला असल्याने आवक कमी प्रमाणात होत आहे. यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास ज्वारी व दादर मिळून 25 हजार क्विंटल एवढी आवक बाजार समिती झाली असून जवळपास 2 हजार ते 2 हजार 800 एवढा भाव ज्वारी व दादरला मिळत आहे.

या वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ज्वारी व दादरची 60 हजार क्विंटलची आवक बाजार समितीत झाली होती. तेव्हा दर 2 हजार 500 ते 2 हजार 600 एवढा होता. यावर्षी पाण्याचा प्रादुर्भावामुळे ज्वारी (Sorghum) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यंदा आवक कमी झाली आहे. आता हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने 100 ते 150 क्विंटल एवढीच आवक रोज बाजार समितीत होत आहे. पण आवक कमी झाल्याने भाव वाढण्याची कोणती शक्यता नसल्याने दर स्थिर राहतील असे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर म्हणाले. भावात काहीच फरक पडणार नाही व आवक देखील आता वाढणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Translate »
X