महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून कोकेनची तस्करी,५.६८ कोटीच्या मालासह तीन महिला अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई शाखेने अत्यंत सावधगिरीने आखलेल्या कारवायांद्वारे, अमली पदार्थांच्या तस्करीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. डीआरआय मुंबई शाखेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत, महिलांचा वापर करून, नवनवीन मार्गांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा तपास लावला आहे. यामध्ये परदेशी महिलांच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड आणि गुदाशयामध्ये दडवून भारतात अमली पदार्थ आणले जात होते. यापूर्वी या टोळ्या सामानामध्ये अमली पदार्थ लपवण्यासाठी विविध कल्पक पद्धतींचा अवलंब करत होत्या.

गेल्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत, डीआरआय मुंबई शाखेने तीन प्रवाशांकडून एकूण 568 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे 5.68 कोटी रुपये इतकी आहे. सॅनिटरी पॅडमध्ये लपवून कोकेनची तास्कारी करणाऱ्या दोन महिला युगांडा इथल्या होत्या. तिसरी प्रवासी महिला टांझानिया येथील होती आणि तिने कोकेन असलेली कॅप्सूल गुदाशयामध्ये लपवून ठेवली होती. एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदी अंतर्गत, हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून तीनही महिला प्रवाशांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या कारवाई मधून, अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तस्कर टोळ्या अवलंबत असलेल्या नवनवीन पद्धती शोधून, समाजाचे अमली पदार्थांच्या विळख्यापासून रक्षण करण्यासाठी, एक अंमलबजावणी संस्था म्हणून डीआरआयचे समर्पण आणि व्यावसायिकता दिसून येते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »