DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहर परिसरात राहणाऱ्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी ,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही काश्मिरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, त्यावेळी त्यामध्ये तिघेही जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.
काश्मीर येथे पहेलगाम येथे दहशतवादयानी पर्यटकावर जो भ्याड हल्लात सहा महाराष्ट्रीयन नागरिकांचा मृत्यू झाला.बुधवार 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तोंडाला काळा पट्टी लावून मुक आंदोलन केले. धर्म विचारून नंतर हत्या करण्यात आल्या. आतापर्यंत वलग्ना करणाऱ्या केंद्र सरकारने आता पाक कृत दहशत वाद्याचा बिमोड करतील का असा सवाल यावेळी मनसेने केला आहे.आता खूप झाले काही तरी ठोस कृती करावी असे बोलत मनसे कडून भाजप सरकारचे कान तोचण्यात आले.