DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पश्चिम विभागातील कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्था( रजि ). आणि कपिलवस्तू महिला मंडळ कुंभारखाण पाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिव जयंती – भीम जयंती सोहळा २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी २० एप्रिल रोजी साजरा येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.
डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखान पाडा परिसरातील कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिव जयंती व भीम जयंती सोहळा कुंभारखान पाडा गणेश घाट मैदान डोंबिवली पश्चिम येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित
करण्यात आला असून या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा भाजपा कार्यकारी अध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण, स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती विकास गजानन म्हात्रे,माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संस्थेच्या वतीनेलहान मुलांसाठी व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमा सह संस्थेतीलपदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ.संस्थेच्या संस्थापक सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तसेच महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात येण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे.
भन्ते डॉ.राहुल रत्न थेरो यांच्या हस्तेबुद्ध पूजा पाठ कार्यक्रम.समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमालाप्रमुख वक्ते आयु. एन एस भालेराव.हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.अरविंद मोहिते यांचा धम्मपद एक धम्मदेसना भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.