महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

केडीएमसीच्या कोविड सेंटरचा शिवसेना खासदार,भाजपा आमदार यांचा पाहणी दौरा

नेशन न्युज मराठी टीम.

डोंबिवली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशात सर्वत्र कोरोनाची तिसरी लाट आल्याचे दिसत असून समूह संसर्गाने संक्रमित होणारी दैनंदिन रुग्णसंख्या खुप मोठ्या प्रमाणावर सध्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून या दृष्टिने अधिक सक्षम होत कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांकरिता जास्तीत जास्त खाटां उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिके तर्फे डोंबिवली एमआयडीसी येथे ५०० खाटांचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय उभारण्याचे काम सुरु असून या कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी करत तेथील आरोग्य यंत्रणा आणि व्यवस्थापनाचा आढावा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे व भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतला घेतला.

https://youtu.be/SR5nTq37seY

रुग्णालयामधील २५० खाटांच्या आयसीयु विभागात २०० आयसीयु खाटां आणि ५० नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) व बालरोग अतिदक्षता विभाग (PICU) असणार असून उर्वरित सर्व ऑक्सिजन खाटां असणार आहेत. डोंबिवली परिसरातील कोरोना संक्रमित रुग्णांना स्थानिक पातळीवर खाटा उपलब्ध होत त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत याकरिता आतापर्यंत कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मनपा परिक्षेत्रात अनेक ठिकाणी डेडिकेटेड कोविड रुग्णालये, कोविड सेंटर्सच्या माध्यमातून ९००० खाटां उपलब्ध केल्या आहेत. या कोविड रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध होणार आहे. अद्ययावत आरोग्य यंत्रणा, सर्व सुविधांनी सुसज्ज आणि येथील तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांवर येथे तातडीने आणि योग्यप्रकारे उपचार होतील.या वेळी केडीएमसी आयुक्त तसेच पालिकेचे इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »