Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image लोकल बातम्या

शाहू सावंत प्रतिष्ठानच्या वतीने डोंबिवलीत `सन्मान रणरागिनींचा` कार्यक्रमाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – शाहू सावंत प्रतिष्टान आणि डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून युवा नेते डॉ.सर्वेश शाहू सावंत यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शास्त्रीनगर येथील सखाराम कॉम्प्लेस जवळ सन्मान रणरागिनींचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात शास्त्रीनगर,कैलास नगर,कोपर रोड,सखाराम नगर विभागातील अनेक महिलांनी भाग घेतला. कार्यक्रमात महिलांसाठी विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले होते. हळदीकुंकू समारंभात तर महिलांची अफाट गर्दी दिसली. यावेळी लकी ड्रॉ विजेत्या संगीता सुनील ऐवले यांना मानाची पैठणी देण्यात आली. अन्य विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रश्मी सावंत, शीतल सावंत, रिशिता राऊत, पुनम कुलकर्णी,सनवी झाजाम,अक्षता घोसाळकर, संस्कृती गावडे, मीना कोलवलकर,दिपाली कदम, स्मिता गोगर, तृषाली नाईक, ऐश्वर्या शिरसेकर,शोभा सावंत महिलांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X