नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – 3 मार्चच्या सुमारास 2 किलो ड्रग्स मोठा साठा पोलिसांनी पकडला होता. पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला यामध्ये एक नागपूरचा स्थानिक गुन्हेगार असल्याचे आढळून आल्यावर त्यास अटक करण्यात आली होती. अक्षय येवले हा देखील नागपूरचा असून याच्यावर अगोदरच खुणासारखे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला देखील अटक करण्यात आली होती.पंकज चद्दे, अक्रम खरडे, हे आरोपी एक मुंबईचा असून एक नागपूरचा आहे मात्र तो मुंबईलाच राहत असल्याचं कळलं. या दोघांवर देखील अगोदरच गंभीर गुन्हे दाखल आहेत म्हणून हे होळीचे निमित्ताने गोव्याला सेलिब्रेशन करण्याकरता गेले असल्याचे आम्हाला कळल्यावर आम्ही स्पेशल टीम गोव्याला पाठवून या दोघांना अटक करून घेतली. अशी माहिती अमितेश कुमार पोलिस आयुक्त नागपूर यांनी माध्यमांना दिली.
यातील एक आरोपी संदीप तिवारी हा वाराणसी येथील असून तो या सर्वांना आमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याची माहिती आहे. संदीप तिवारीला काल वाराणसी हून अटक करून नागपूरला आणण्यात आलं असून त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे.त्यामुळे या संपूर्ण घटना क्रमात संदीप तिवारी हा मुख्य सूत्रधार दिसून येत आहे ,2018 मध्ये त्याच्यावर मुंबई येथे एक हजार कोटी ड्रग प्रकरणी कारवाई करण्यात आली होती त्यामुळे त्यांना दोन वर्षाची शिक्षा देखील करण्यात आली होती. मुंबई येथे आंतरराष्ट्रीय रॅकेट पकडण्यात आला होता त्यामधील आरोपी संदीप तिवारी असून तो सध्या जेलबाहेर बेलवर होता. तो वाराणसीतील गावात असल्याचं कळतच आम्ही आमचं पथक पाठवून त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेतला आहे.नागपूर मध्ये एक गाडी देखील पकडण्यात आलेली आहे ज्या गाडीतून अमली पदार्थ सप्लाय करण्यासाठी वापर करण्यात येत होता त्या गाडीच्या सीट मध्ये लपवून हे सप्लाय करत होते बरेचसे छोटे छोटे पाकीट या गाडीच्या सीटला बनविण्यात आले होते. आत्तापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे रॅकेट पसरलं आहे त्याचा तपास युद्धपातळीवर सुरू असून लवकरच इतर आरोपींनाही ताब्यात घेतले जाईल.असे अमितेश कुमार पोलिस आयुक्त नागपूर यांनी माध्यमांना सांगितले.



