महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
बिझनेस लोकप्रिय बातम्या

लॉजिस्टिक क्षेत्रात महिलाचा सहभाग वाढवण्यासंदर्भात डीपीआयआयटीतर्फे परिसंवादाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे काल उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) लॉजिस्टिक क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग कसा वाढवता येईल या विषयावरचा परिसंवाद आयोजित केला होता.

विकसित भारत व्हिजन 2047 चा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लॉजिस्टिक क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डीपीआयआयटीचे अतिरिक्त सचिव राजीव सिंग ठाकूर यांनी बीजभाषण केले. लॉजिस्टिक उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच त्यातील नावीन्यतेसाठी पुरूष आणि स्त्रियांच्या समान आणि परस्परपूरक सहभागाचे महत्त्व त्यांनी विशद केले. कृतीशील दृष्टीकोन आणि सहयोगी प्रयत्नांवर भर देणाऱ्या त्यांच्या भाषणामुळे दिवसभराच्या इतर चर्चेसाठी वातावरणनिर्मिती झाली.

उद्योग संघटना, सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योग (एमएसएमई), मोठे व्यवसाय, कौशल्य विकास संस्था, शैक्षणिक संस्था, द्विपक्षीय आणि बहुआयामी संस्थांच्या 50 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग नोंदवला. त्यांनी लॉजिस्टिक्स क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठीचे मार्ग  सुचवले.  लॉजिस्टिक्स साखळीतील सर्व पातळ्यांवर महिलांचा सहभाग वाढवण्याला प्रोत्साहन देणारी आधारभूत परिसंस्था तयार करण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

या क्षेत्रात महिलांच्या प्रवेशात येत असलेल्या अडथळ्यांबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली, त्यात पायाभूत अडथळ्यांपासून महिला सुरक्षा, प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकास यासाठी धोरणात्मक सुधारणा या विषयांवर चर्चा झाली. लॉजिस्टिक क्षेत्रातील महिलांची कार्यक्षमता आणि काहीतरी नवीन करण्याची सुप्त ऊर्मी याबद्दलही उपस्थितांनी मते व्यक्त केली. यासंदर्भातील जगभरातील यशोगाथा आणि उत्तम पद्धतींची उदाहरणे यावेळी देण्यात आली. महिलांच्या या क्षेत्रातील वाढत्या सहभागामुळे या क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाची माहितीही समोर आली.

लॉजिस्टिक्स क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सक्षम वातावरण तयार करण्यासाठी काय करता येईल, याविषयी सर्व संबंधित भागधारकांकडून भविष्यात सविस्तर अभिप्राय घेण्यात येणार आहे.

Related Posts
Translate »