महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत लेखक,भाषा आणि लोकशाही विषयावर परिसंवाद

नाशिक/प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच ‘लेखक, भाषा आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नागरीकांनी पॉलिटेक्निक बिल्डींग येथील उपमंडप या ठिकाणी ४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत या परिसंवादात उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे होणारा परिसंवाद Chief Electoral Officer Maharashtra या फेसबुक पानावरून आणि https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरूनही ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मतदाराच्या जनजागृतीसंबंधी प्रकाशने आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळ यांचे दालनही असणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. यासंबंधी व्यासपीठे, शाळा- महाविद्यालये, गावा-परिसरांमध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकाही या दालनात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनाला भेट देऊन लोकशाही संबंधीचे ल्युडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत, असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. लेखक हा सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लेखक आणि त्याची लेखणी व त्यांची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, मराठी भाषेच्या चळवळीतले प्रा. कौतिकराव ढाले-पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पत्रकार आणि संपादक इब्राहीम अफगाण व दीप्ती राऊत, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी मान्यवर यात सहभागी होणार आहे. या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार करणार असल्याचेही उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »