नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम रविवारी पूर्ण झाले असून हा पूल आता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे. या उड्डाणपुलाची बेअरिंग निखळल्याने पूल हलू लागला होता. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.अभियंत्यांची टीम आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करून या पुलाच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर अवघ्या चार दिवसांतच पूर्ण करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे.
Related Posts



