महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

मुंबईत २६३ कोटी रुपयांचा जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीस, एकाला अटक

नेशन न्युज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 263 कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीला आणला असून यात 7.66 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) इनपुट टॅक्स क्रेडिटचा समावेश आहे. याप्रकरणी मे. श्री बालाजी गोल्डच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

प्रधान मुख्य आयुक्त, सीजीएसटी मुंबई क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय गुप्तवार्ता एकाकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या करचुकवेगिरी-विरोधी शाखेने तपास सुरू केला होता. केंद्रीय गुप्तवार्ता एककाकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या आणि इतर माहितीच्या आधारे, मालाचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पावत्या  जारी करून बनावट आयटीसी मिळवणे आणि मंजूर  करणे, या संदर्भात मे. श्री बालाजी गोल्ड विरोधात तपास सुरू करण्यात आला.

फर्मच्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणाहून कोणतेही कायदेशीर व्यवसाय करण्यात आले नसल्याचे, मेसर्स श्री बालाजी गोल्डच्या नोंदणीकृत परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत आढळून आले.

फर्मचा मालक 19.10.2023 रोजी तपासात सामील झाला. त्याची साक्ष नोंदवण्यात आली.  त्यामध्ये त्याने या कर फसवणुकीत आपला हात असल्याचे कबूल केले. या फर्मने मालाचा पुरवठा न करता 7.66 कोटी रुपयांच्या आयटीसीसह 263 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांवर फसवून इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन करून, प्रत्यक्षात माल प्राप्त न करता फसव्या पद्धतीने, अस्वीकार्य इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठीच्या बोगस पावत्या प्राप्त करण्यात आल्या होत्या.

तपासादरम्यान मिळालेले  प्रत्यक्ष  पुरावे आणि या करफसवणुकीत सहभागी असल्याची आरोपीची कबुली या आधारे आरोपीला, सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 20.10.2023 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत. हे प्रकरण सीजीएसटी मुंबई क्षेत्राने करचुकवेगिरी करणारे आणि बनावट आयटीसी नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम सीजीएसटी अधिकारी येत्या काही दिवसात अधिक जोरदारपणे राबवणार आहेत. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »