नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – अंबड तालुक्यातील गल्हाटी धरणा 1998 पासून कधीच पूर्ण क्षमतेने भरत नाही. या धरणात जायकवाडीच्या डाव्या कलव्यातून किंवा शहागड येथील गोदावरी नदी पत्रावर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून या गल्हाटी धरणात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी एक तासापासून गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने अंबड तालुक्यातील शहापूर रोड वर रस्ता रोको आंदोलन सुरु आहे.
त्यामुळे जालना- वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमात वाहतूककोंडी झाली आहे. यावेळी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या आणि धरण संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला आपल्या मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही यावेळी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.



