नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (LIDCOM), आणि डॉ. बाबू जगजीवन राम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (LIDKAR), बंगळुरू, कर्नाटक यांनी जुलै 2019 मध्ये भौगोलिक मानांकन (जीआय ) अंतर्गत कोल्हापुरी चप्पलेची नोंदणी केली होती, ज्यासाठी तामिळनाडूतील चेन्नई स्थित सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी सहकार्य केले होते. म्हणूनच, महाराष्ट्राच्या जीआय कारागिरांच्या समर्थनार्थ संबंधित संस्थेने हा विषय हाती घेतला आहे.
पारंपरिक डिझाईन्सच्या उल्लंघनाचे संरक्षण करण्यासाठी, राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रम (एनएचडीपी) च्या संशोधन आणि विकास घटकांतर्गत विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालय पारंपरिक हस्तकलांच्या जीआय नोंदणीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. कारागिरांना जीआय नोंदणीचे महत्त्व आणि अधिकृत वापरकर्ता म्हणून वापर याबद्दल जागरूक करण्यासाठी ते कार्यशाळा/चर्चासत्र देखील आयोजित करते. एनएचडीपी योजनेच्या विपणन घटकांतर्गत, ग्राहकांमध्ये लोकप्रियता वाढवण्यासाठी तसेच त्यांना शिक्षित करण्यासाठी जीआय थीम पॅव्हेलियनसह वेळोवेळी विपणन कार्यक्रम आयोजित केले जातात.
अशा कारागिरांच्या उत्पादनांच्या निर्यात क्षमतेला चालना देण्यासाठी विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) मार्फत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळे आणि प्रदर्शनांमध्ये हस्तकला प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवले जातात , निर्यात प्रोत्साहन परिषदांना पाठिंबा देण्यात येतो,डिझाइन आणि क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जीआय-टॅग केलेल्या हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल ऑनबोर्डिंग आणि ई-कॉमर्स सक्षमीकरण सुलभ करते.वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.