DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्यातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने संविधानाने दिलेल्या हक्काचे पाय मल्ली करणारे जन सुरक्षा विधेयक तात्काळ मागे घ्यावे प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेड प्रदेश यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ डोंबिवली पूर्व येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक नुकतेच महाराष्ट्र सरकार ने विधानसभेत पारित केले. मुळात हे विधेयक भारताच्या संविधान विरोधी आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. या विधेयकामुळे नागरिकांच्या हक्काची पायमल्ली होणार आहे. या विधेयकामुळे न्यायालयीन प्रक्रिया बाजूला ठेवून कोणत्याही व्यक्तीला अटक करून पुरावा न देता कारवाई केली जाऊ शकते अमर्यादा हक्क शासनाला या विधेयकामुळे दिले आहेत, सरकारविरोधी मत व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यावर, पत्रकारावर, आंदोलन कर्त्यावर या विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो त्यांचे अबाधित स्वातंत्र्य, संविधानिक हक्क काढून घेण्याचे काम या विधेयकामुळे झाले आहे. रस्त्यावर उतरून आपल्याला न्याय हक्कासाठी लढणाऱ्या समाज घटकावर, अल्पसंख्याक समाजावर हे कायदे वापरले जाऊ शकतातअशी शंका यावेळी घेण्यात आली त्यामुळे डोंबिवली शहरात आंदोलन करून या हुकूमशाही विधेयकाचा निषेध करत महाराष्ट्र सरकारने तात्काळ हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्याकडून करण्यात आली.
त्याच बरोबर सर्व समाजात सलोखा बंधूभाव निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्यात कायम काम करणारे, अंधश्रद्धा विरोधी जागृती निर्माण करण्याच महत्त्वपूर्ण कार्य करणारे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म संघटनेचे, भाजपाचे इंदापुरातील पदाधिकारी गुंड दीपक काटे व त्यांच्या इतर साथीदाराने जो भ्याड हल्ला केला त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात यावी त्याचबरोबर राज्यात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे मा. प्रवीण दादा गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाने तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे. ही सुद्धा मागणी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्या कडून करण्यात आली.या दरम्यान जर सरकारने आमच्या या मागणीवर लक्ष दिले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी पक्षाने दिला आहे.