महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य महत्वाच्या बातम्या

रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – डॉक्टर रुग्णांची काळजी घेतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांचे प्राणही वाचवतात. आपल्या समाजात डॉक्टरांचे स्थान हे देवासारखे असले तरीही डॉक्टर काही देव नाही. मरणाऱ्या व्यक्तीला परत जिवंत करणे डॉक्टरांच्या हातात नाही आहे. पण उपचारा दरम्यान रुग्णाला काही झाले की त्याचा सगळा दोष हा डॉक्टरांवर येतो. अशा वेळेस अनेकदा डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आज ऐरणीवर आला आहे.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेला रुग्ण दगावल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच ब्रदरला रुग्णालयाच्या आवारात चाकूचा धाक दाखवला. त्याच्या निषेधार्थ शनिवारी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत कामबंद आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली. पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग कामावर रुजू झाले.

मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटेच्या सुमारास 24 वर्षीय तरुणाची छाती दुखत असल्याने त्याला उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णाला पाच वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित वॉर्डमध्ये दाखल केले. त्यानंतर काही वेळाने रुग्ण दगावला. रुग्ण दगावल्याची माहिती मिळताच दारूच्या नशेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील दिव्यांग कर्मचारी राहुल गायकवाड यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयातील ब्रदर किरण पारधे यांना चाकूचा धाक दाखवला.

या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात आक्रोश व्यक्त करत कामबंद आंदोलन पुकारले होते. तसेच यावेळी घोषणाबाजी करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली मारहाण आणि चाकूचा धाक दाखविल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. या घटनेनंतर बंदोबस्त वाढविण्याबरोबर आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत ते परत आपल्या कामावर रुजू झाले.

Related Posts
Translate »