नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – आधी अपुऱ्या पावसाने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु परतीच्या मुसळधार पावसाने लावलेल्या पिकांवर पाणी फेरले आहे. चोपडा तालुक्यात गेल्या आठवडा पासून सुरू असलेल्या पावसामुळे कापसाच्या पिकाच नुकसान होत आहे. कापूस आता वेचणीला आला आहे आणि पाऊस सुरू असल्याने फुटलेला कापूस खराब होऊ लागला आहे.
ज्यावेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस झाला नाही आणि आता कापूस वेचणीला आला आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान होत आहे. उत्पन्नात देखील घट होणार आहे, पाऊस नव्हता तेव्हाही शेतकरी अडचणीत सापडला होता आणि आता पाऊस आहे तरी शेतकरी संकटात सापडला आहे.



