महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर ताज्या घडामोडी

आम्हाला जागा उपलब्ध करून द्या,अन्यायकारक कारवाई थांबवा – खासगी बसमालकांची मागणी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या बसेसवर सुरू करण्यात आलेली कारवाई थांबवावी आणि आम्हाला बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमेतील बस चालकांनी केली आहे. यासंदर्भात या बसमालकांनी गेल्या काही दिवसांत खासदार, आमदार आणि केडीएमसी आयुक्तांची भेट घेत ही मागणी केली आहे.

कल्याण पश्चिम परिसरात विविध नामांकित कंपन्यांच्या सुमारे 100 च्या आसपास खासगी बसेस आहेत. हे सर्व बस जण मुंबई बस मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेत वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या बसेसवर नो पार्किंगची कारवाई केली जात आहे. त्याविरोधात हे सर्व बसमालक एकवटले असून त्यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. कल्याण शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना त्यामध्ये आमच्या बसेसच्या पार्किंगचाही विचार केला पाहिजे. आम्ही सरकारला दरमहिन्याला साधारणपणे 10 हजार ते 30 हजार पर्यंतचे कर भरतो. तरीही आमच्यावर ही नो पार्किंगची कारवाई का असा संतप्त सवाल मुंबई बस मालक संघटनेने केला आहे.

दरम्यान या सर्व बस चालकांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची भेट घेत त्यांना याप्रश्नी लक्ष घालण्यासाठी साकडे घालण्यात आल्याची माहिती मुंबई बसमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तर आम्हाला बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्याचे आवश्यक ते सर्व शुल्क भरण्यासही तयार आहोत. तसेच जोपर्यंत आम्हाला ही जागा उपलब्ध होईपर्यंत वाहतूक पोलिसांकडून सुरू असणारी ही कारवाई त्वरित थांबवण्याची मागणीही मुंबई बस मालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »