महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे थोडक्यात

आपत्तीग्रस्तांचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या- खासदार बाळ्या मामा यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

DESK MARATHI NEWS ONLINE.

भिवंडी/प्रतिनिधी -अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यातील भिवंडी : ४ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळ वाऱ्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी,वाडा,शहापूर,मुरबाड व कल्याण तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतीसह नागरिकांच्या मालमत्ता व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सामान्य नागरिक संकटात सापडले असून आपत्तीग्रस्तांचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांसह सर्वच आपत्तीग्रस्तांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सोमवारी शहापूर मधील नुकसानग्रस्त भागांना आपण स्वतः भेटी दिल्या होत्या.यावेळी येथील तहसीलदारांना दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानग्रस्तांचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तत्काळ प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शहापूर प्रमाणेच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी व सामान्य नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.त्यामुळे या सर्वांचेच पंचनामे शासकीय यंत्रणांनी लवकरात लवकर करून त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आपण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून या संदर्भात लवकरच पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आपण भेट घेणार आहोत अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×