महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने

 

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इडीने बजावलेल्या नोटीस आणि त्याबाबत सुरू असणाऱ्या चौकशीनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. दिल्ली आणि मुंबईपाठोपाठ आज कल्याणातही काँग्रेसने इडीविरोधात निदर्शने केली.
नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारप्रकरणी गेल्या 2 दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. या पार्शवभूमीवर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केले जात आहेत.

कल्याणमध्ये तहसील कार्यालयाबाहेर आज कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला. देशात बेरोजगारी, महागाई वाढतेय, महिला अत्याचार वाढत आहे असे अनेक प्रश्न असताना भाजपकडून काँग्रेस नेत्यांवर इडीचा दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करत दडपशाही, हिटलरशही सुरू असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.

तसेच देशामध्ये लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम मोदी सरकारकडून सुरू असून त्याविरोधात भाजपचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात आंदोलन केलं जातं असल्याचेही पोटे यांनी सांगितलं. तसेच ही कारवाई थांबली नाही तर येत्या काळात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष पोटे यांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त, कल्याण पश्चिम ब्लॉकअध्यक्ष विमल ठक्कर, सदस्य मुन्ना तिवारी, युवक काँग्रेसचे मनिष देसले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »