महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

नाशिक मनपाच्या कचरा डेपो बाहेर ठाकरे गटाचे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक / प्रतिनिधी – नाशिक शहरालगत असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या कचरा डेपो बाहेर आज ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नाशिक शहरातून जमा करून आणणाऱ्या घंटागाड्या यावेळी ठाकरे घाटाकडून गेटवरच अडवण्यात आल्या होत्या. कचरा डेपो मधून कचऱ्याचा निचरा होऊन निघणाऱ्या दुर्गंधीत पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी ठाकरे गटासह कचरा डेपो परिसरातील रहिवाशांनी आणि काही ग्रामस्थांनी या ठिकाणी आंदोलन केले .

23 वर्षांपासून असलेल्या कचरा डेपो मधील दुर्गंधीयुक्त पाणी हे परिसरातील शेती आणि विहीर मध्ये उतरत असल्याने दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला. यावर कायमस्वरूपी ड्रेनेज लाईन टाकून पाणी हे ड्रेनेजमध्ये सोडण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली नाशिक ते ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट , यांच्यासह कचरा डेपो परिसरातील ग्रामस्थांनी कचरा डेपोच्या प्रवेशद्वारावर बसून घेत आंदोलन केले.

यावर लवकरात लवकर तोडगा काढावा तसेच या समस्येचे निराकरण करावे अन्यथा हा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला. यावेळी गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर गेटवर रास्ता रोको करण्यात आला होता पोलिसांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »