नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – ठाण्यात संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्ह्याधिकारी कार्यलयाजवळ निदर्शने करण्यात आली. जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे सरकार जनरल डायरचे सरकार आसल्याची घणाघाती टीका केली.
यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साडी आणि बांगड्या यांचा आहेर पाठवला. रक्षा बंधनानिमित्त ही भेट देत असून ही प्रेमाची भेट आहे. हे सरकार हुकूमशाही सरकार आहे ,आंदोलकांना रक्तबंबाळ केले मात्र याचा निषेध करतानाही प्रेमाने निषेध करत असून ही भेट मुख्यमंत्र्यांनी स्विकारावी आणि मराठा समाजावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.



